अहमदनगर (प्रतिनिधी) १७.११.२०२३
वादग्रस्त नट शरद पोंक्षे याने अभिनय केलेले पुर्वीचे मुळ 'मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक पूर्ण राज्यात ‘प्रचंड गाजले होते. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या नाटकाचे प्रयोग बंद होते. शरद पोंक्षे याने ऑक्टोबर महिन्यापासून हे नाटक नविन नावाने पुन्हा एकदा रंगभूमीवर आणले आहे. याबाबत निर्माते उदय धुरत यांच्यासोबत वाद झाल्याचे सर्वश्रुत आहे. वादग्रस्त नाटकाच्या शिर्षकासह संहिता ढापल्याचा आरोप मूळ नाटकाचे निर्माते उदय धुरत यांनी वादग्रस्त नट पोंक्षेवर केला होता. ज्येष्ठ नाटककार प्रदीप दळवी लिखित ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक नाट्यनिर्माते उदय धुरत यांनी ता. १० जुलै १९९८ रोजी माऊली प्रॉडक्शनच्यावतीने रंगभूमीवर आणले होते. या नाटकाचे दिग्दर्शन लोकप्रिय अभिनेते दिग्दर्शक विनय आपटे यांनी केले होते. शरद पोंक्षे याला त्यात नथुरामची भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. त्याने केलेली भूमिका लोकप्रिय ठरली. गांधीद्वेषाने वादग्रस्त ठरल्यामुळे हे नाटक चर्चेत होते. नाटकाचे ८१६ प्रयोग झाल्यानंतर २०१६ मध्ये निर्माते उदय धुरत यांनी हे नाटक थांबविण्याचा निर्णय घेतला होता.
राज्यात सुमारे १००० हून अधिक प्रयोग झालेल्या मुळ नाटकाचे नविन नावाने विशेष प्रयोगाचे आयोजन अहमदनगरमध्ये जिल्हा ब्राह्मण सेवा संघाच्या वतीने करण्यात आले आहे. दीपावलीनिमित्त उद्या शनिवारी ता. १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात ‘नथुराम गोडसे बोलतोय’ हे नविन नाटक होणार आहे, अशी माहिती जिल्हा ब्राह्मण सेवा संघाचे अध्यक्ष किशोर जोशी यांनी दिली.
‘नथुराम गोडसे बोलतोय’ या नविन नाटकात शरद पोंक्षे याने नथुराम गोडसे याची भूमिका साकारली आहे. नव्या पिढीला इतिहासाचे ज्ञान व्हावे, या उद्देशाने शरद पोंक्षे हे नाटक सादर करत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांनी या नाटकाचा अवश्य लाभ घ्यावा. नाटकाच्या प्रवेशिका जुन्या कोर्टासमोरील स्वागत झेरॉक्स व चौपाटी कारंजा येथील शिवनेरी बँगल्स येथे तसेच प्रयोगाच्या वेळी सहकार सभागृहात उपलब्ध होणार आहेत. अधिक माहितीसाठी ९२७२५८१५१५ व ९१३०८३८३४९ या मोबाईलवर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
Post a Comment