अहमदनगर (प्रतिनिधी) ६.२.२०२४
राज्यासह देशात प्रसिध्द असलेल्या नगर अर्बन बँकेच्या २९१,२५,६१,०००/- रूपयांच्या कर्ज घोटाळ्याच्या अटकेत असलेला बँकेचा माजी अध्यक्ष अशोक कटारिया, भाजपाचा माजी मनपा स्थायी समिती सभापती मनेष साठे आणि सरकारी कंत्राटदार अनिल कोठरी याला आज न्यायालयाने पोलिस कोठडी दिली.
आर्थिक गुन्हे शाखेने टाकळी ढोकेश्वर येथील अशोक कटारिया, मनेष साठे, अनिल कोठारी यांना अटक केल्यावर न्यायालयाने त्याला ५ तारखेपर्यंत पोलिस कोठडी दिली होती. त्यांना आज न्यायालयात पुन्हा हजर केले. यावेळी पोलिसांनी तपासाची माहिती दिली. मुख्य तपासी अधिकारी गैरहजर असल्याने वाचक यांनी माहिती दिली.
सरकारी पक्षाच्यावतीने ॲड. मंगेश दिवाणे यांनी युक्तिवाद केला. आरोपींच्या वतीने ॲड. महेश तवले, ॲड. संजय दुशिंग,आणि संजय वालेकर यांनी बाजू मांडली.
किती आरोपी पकडले?, जे आरोपी आहेत त्यांनी सांगितलेल्या पोलीस ठाण्यात हजेरी लावली का? नसेल लावली तर तुम्ही काय कारवाई केली? तुम्ही काय एक्शन घेतली पोलिसांना न्यायालयाने असे सवाल केले. प्रॉपर्टी जप्त केली का? तुमच्याकडे सल्ला देणारे कोणी आहे का नाही?
ठेवीदारांच्या वतीने ॲड. अच्युतराव पिंगळे यांनी बाजू मांडली. आरोपी रात्री घरी येत असल्याचे त्यांनी सांगितल्यावर रात्री पिंजरे लावा, मोठा मासा पकडा त्याची प्रॉपर्टी जप्त करा. गुन्ह्यातील १०५ लोकांच्या प्रॉपर्टी जप्त करा. सातबारे काढा त्यासाठी तहसीलदारांची मदत घ्या. ठेवीदारांचे पैसे त्यांना आधी दिले पाहिजेत. असेही कोर्टाने आर्थिक गुन्हे शाखेला सुनावले.
मर्दाबाबत न्यायालयाने विचारणा केली असता, पोलिसांनी सांगितले आरोपीचा पासपोर्ट जप्त केला आहे. बाकी कारवाई सुरू आहे. मात्र आज तपासी अधिकारी आले नाहीत डिवायएसपी खेडकर प्रभारी अधिकारी होते, मात्र त्यांच्या जागी बदली होऊन दुसरे अधिकारी आल्याने खेडकर न्यायालयात आले नव्हते.
शहरातील शहर सहकारी बँकेच्या घोटाळा प्रकरणी जमिनीवर असलेला चार्टर्ड अकाउंटंट विजय मर्दा हा न्यायालयाने ठरवून दिलेल्या तारखेला हजर राहत नाही, पोलिस स्टेशनला येत नाही, त्याच्यावर पोलीस अटकेची कारवाई का करत नाही? अशी बाजू न्यायालयात ठेवीदारांच्या वतीने मांडण्यात आली.
ठेवीदारांचे पैसे आधी दिले पाहिजेत असे एमपीआयडी न्यायाधिश प्रशांत शित्रे यांनी सांगितले.
◾
BolBhasha Travellers Enquiry साठी संपर्क करावा
मटा.ची बातमी वाचा : रिअल इस्टेट एजंट म्हणून काम करायचंय, आता द्यावी लागणार परीक्षा, रेराचा नवा नियम जाणून घ्या
हे हि वाचा : 'सोने' व 'चांदी' बाजारभाव पहाण्यासाठी येथे क्लिक करा
Post a Comment