शब्दगंध चे सभासद होण्याचे आवाहन

अहमदनगर - शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने नवोदित लेखक, कवी साठी विविध साहित्यिक उपक्रम राबविण्यात येत असून शब्दगंध च्या वतीने वर्षातून एक राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. शब्दगंध ही ग्रामीण भागातील सर्वांनी एकत्र येऊन स्थापन केलेली संस्था असून संस्थेच्या तालुकास्तरीय शाखाही कार्यरत आहेत,अशा या संस्थेचे सभासद होण्यासाठी संस्थापक सचिव सुनील गोसावी यांचेशी 9921009750 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी केले आहे. 
दर तीन वर्षांनी मुख्य कार्यकारी मंडळ तर दर दोन वर्षांनी तालुकास्तरीय शाखा कार्यकारी मंडळाची निवड करण्यात येते. यावर्षी ही प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्या निमित्ताने लेखनाची आवड असणारे नवोदित साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम करण्याची आवड असणारे शिक्षक, पत्रकार, प्राध्यापक, कलावंत, श्रमिक, कष्टकरी, डॉक्टर,इंजिनिअर, समाजसेवक या सर्वांना संस्थेचे सभासदत्व देण्यात येते.
               तरी सभासद होऊ इच्छिणाऱ्यांनी  8 डिसेंबर 2024 पर्यंत 9921009750 वर संपर्क साधावा,असे आवाहन संस्थापक सचिव सुनील गोसावी, अध्यक्ष राजेंद्र उदागे, खजिनदार भगवान राऊत, कार्याध्यक्ष प्रा.डॉ.अशोक कानडे, कार्यवाह सुभाष सोनवणे, उपाध्यक्ष शाहीर भारत गाडेकर,प्राचार्य डॉ.गुंफा कोकाटे, सहसचिव सुनील धस, प्रा.डॉ. तुकाराम गोंदकर,सह कार्यवाह अजयकुमार पवार, राज्य संघटक शर्मिला गोसावी, प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र फंड,संयोजन समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, राज्य कार्यकारिणीचे सदस्य स्वाती ठुबे, बबनराव गिरी, राजेंद्र पवार,किशोर डोंगरे, रामकिसन माने, बंडूसेठ दानापुरे यांनी केले आहे

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा