८ डिसेंबर रोजी शिर्डीत ई- सेवा व आधार सेवा केंद्र चालक, ऑपरेटरांच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन - लुकेश शिंदे
संगमनेर चे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांची लाभणार प्रमुख उपस्थिती
शिर्डी / प्रतिनिधी:
महाराष्ट्रातील आखिल राज्यस्तरीय महा ई सेवा केंद्र व आधार सेवा केद्र चालक व ऑपरेटर यांना येणाऱ्या विविध अडचणी व त्यावर उपाय यावर विचार मंथन करण्यासाठी शिर्डी येथे रविवार दिनांक ८ डिसेंबर २०२४ रोजी भव्य असे राज्यस्तरीय अधिवेशन सकाळी १० वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संपन्न होणार असून या अधिवेशनासाठी संगमनेर विधानसभेचे आमदार अमोल खताळ यांच्या सह विविध मान्यवर उपस्थित राहणार असून या कार्यक्रमास आधार केन्द्र चालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिर्डी येथील लुकेश शिंदे यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाने महसूल च्या संबंधित विविध प्रकारचे असलेल्या सेवा जनतेला चांगल्या पद्धतीने मिळाल्या पाहिजेत यासाठी आधार व सेतू केंद्राची स्थापना केली या माध्यमातून चांगल्या पद्धतीने सेवा करण्याचा प्रयत्न या केंद्रचालकांनी देखील केलेला आहे, संगमनेर येथील नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी देखील सेतू व आधारच्या माध्यमातून केंद्र चालून मिळालेल्या जनसंपर्कच्या आधारावर थेट विधानसभेत केलेला प्रवेश हा महाराष्ट्रातील सेतू व आधार केंद्र चालक ऑपरेटर यांच्यासाठी भूषणास्पद अशी बाब ठरलेली आहे, जर चांगल्या पद्धतीने सेवा घडत गेली तर जनता कशाप्रकारे त्याची उतराई करू शकते याचे उदाहरण आमदार अमोल खताळ ठरले आहेत. आधार सेतू केंद्र चालक ऑपरेटर यांच्या विविध अडचणी आहे ते अडचणी अधिवेशनात मांडणार असून या अधिवेशनात या केंद्रचालकांचे विचार मंथन होणार आहे, आता थेट आमदार म्हणूनच एक आधार व सेतू केंद्र चालक महाराष्ट्राच्या विधानसभेत पोहोचल्यामुळे येणाऱ्या विविध अडचणी लगतच्या भविष्यकाळात निश्चितपणे मार्गी लागतील अशी अपेक्षा देखील या आधार व सेतू ऑपरेटर लोकांना असून त्यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आधार व सेतू केंद्र चालक ऑपरेटर या मेळाव्यात सहभागी होणार आहेत करीता राज्यभरातील सेतू आणी आधार ऑपरेटर यांनी सदरील मेळाव्यास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही लुकेश शिंदे यांनी केले आहे.
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार अय्युब पठाण,शिर्डी
*संकलन*
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर
बा./जा.संपर्क क्र. 9561174111
إرسال تعليق