दोन अपूर्ण व्यक्तींचे एकनिष्ठ होऊन जीवनात पूर्णतः आणण्याचा संकल्प म्हणजेच विवाह होय असे प्रतिपादन सुप्रिया निमिष लोहाळे यांनी केले.
आहिल्यानगर येथील उपदेशक साप्ताहिक आणि गोंधवणी येथील सेंट जॉन दि बाप्टिस्ट चर्च यांच्या संयुक्त विद्यमाने येथे नुकतेच ख्रिस्ती वधू,वर सूचक मेळाव्याचे आयोजन केले होते.
याप्रसंगी उद्घाटक म्हणून सिने व मालिका दिग्दर्शक, लेखक निमिष लोहाळे लाभले होते.तर प्रमुख मार्गदर्शिका म्हणून सुप्रिया निमिष लोहाळे या उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी मार्गदर्शनपर भाषणात अतिशय मौलिक विचार मांडून,इच्छुक वधू-वर व पालकांना संबोधित केले. दोन अपूर्ण व्यक्तींचे एकनिष्ठ होऊन जीवनात पूर्णतः आणण्याचा संकल्प म्हणजेच विवाह असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी साप्ताहिक उपदेशकचे संस्थापक अध्यक्ष विक्रम गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेव्ह.डेव्हिड मेश्रामकर उपस्थित होते. तर संगीता गोडे, ॲड. प्रदिप सिंग, अविनाश काळे यांनी मार्गदर्शन केले.याप्रसंगी सेंट जॉन बाप्टिस्ट चर्चचे सचिव उदयसेन राठोड,डी. जे.भांबळ, विजया जाधव, संतोष सगळगिळे, पास्टर अण्णासाहेब अमोलिक, सुभाष खरात, राजेश कर्डक, पीटर बनकर, अरुण मोहन, मोजेस चक्रनारायण, दिपक कदम, अमोल कदम, अजितकुमार सुडगे यांची उपस्थिती होती.
या उपक्रमासाठी विकास प्रभुणे, मिलिंद ठोकळ, बाळासाहेब कसबे,मकरंद चांदेकर,कार्तिकी चांदेकर, कविता गायकवाड, अनिल दुशिंग, मयूर अमोलिक, निखिल चांदेकर, सनी साळवे, जॉनी दिवे, यश पारखे, स्तवन प्रभूणे, प्रेम ठोकळ, राज ठोकळ, आंद्रेस यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमास बीड, छत्रपती संभाजीनगर, कल्याण, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, शेवगाव आदी ठिकाणाहून वधू, वर पालकांची उपस्थिती होती.
याप्रसंगी स्वादिष्ट भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वीततेसाठी चर्च सचिव उदयसेन राठोड, सौरभ जाधव, रूपाली जाधव, ॲड. प्रदिप सिंग यांचे सहकार्य लाभले. राजेश्वर पारखे यांनी सूत्रसंचालन केले. तर प्रकाश लोखंडे यांनी आभार मानले. चर्चचे प्रमुख आचार्य रेव्ह.अनिल वंजारे यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व कार्यक्रमाच्या आयोजनात अविनाश काळे यांचा मोलाचा वाटा होता.
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार दिपक कदम - श्रीरामपूर
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
إرسال تعليق