शिवसेना ओबीसी /व्हीजेएनटी पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर ..श्रीरामपूर शहराध्यक्षपदी विठ्ठल गोराणे तर नगर उपजिल्हा प्रमुखपदी निलेश शिंदे

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या आदेशान्वये प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे, सचिव राम रेपाळे ,सहसचिव एकनाथ शेलार यांच्या हस्ते अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर व राहुरी च्या ओबीसी /व्हीजेएनटी पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करुन त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
      मुंबई येथील बाळासाहेब भवन याठिकाणी पार पडलेल्या बैठकी मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या.या प्रसंगी श्रीरामपूर शहर प्रमुख विठ्ठल गोराणे, उपजिल्हाप्रमुख निलेश शिंदे श्रीरामपूर, विजय थोरात उपजिल्हाप्रमुख राहुरी, प्रशांत खळेकर राहुरी तालुकाप्रमुख, अमोल शिंदे राहुरी शहर प्रमुख ,गिरीश वाडेकर श्रीरामपूर उप शहर प्रमुख यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
या वेळी प्रदेशाध्यक्ष श्री. किसवे यांनी मोलाचे मार्गदर्शन करताना सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना सांगितले की, तुम्ही एकनिष्ठ  प्रामाणिकपणे पक्षासाठी, पक्षवाढी साठी काम करा, पक्ष तुम्हाला भर-भरून  देईल. तुमचे सर्व  कामे, समस्या नक्कीच मार्गी लावल्या जातील असे आश्वासन दिले.
     नुतन पदाधिकाऱ्यांच्या  झालेल्या या निवडीबद्दल शिवसेना नेते माजी आ. भाऊसाहेब कांबळे, माजी नगरसेवक ॲड.संतोष कांबळे यांनी सर्व पदाधिकारी यांचे श्रीरामपूर येथील शिवसेना संपर्क कार्यालयात पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी आ. भाऊसाहेब कांबळे त्यांच्या शुभेच्छापर भाषणात म्हणाले की, मी सुद्धा असेच छोट्या-मोठ्या पदापासून पुढे गेलो, कोणतेही पद छोटे आणि मोठे नसते, मी संत रोहिदास सोसायटीच्या चेअरमन ,पदापासून सुरवात केली, प्रमाणिक काम व  सततच्या जनतेची सेवा केल्याने मी नगरसेवक  झालो व प्रामाणिक काम केल्यामुळे मला संधी मिळत गेल्याने जनसंपर्कही वाढत गेला सामाजिक कार्यकर्ता ते नगरसेवक आणी पुढे तालुक्याचा आमदार असा हा प्रवास पुढे घडत गेला असे सांगून त्यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवत कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली. पक्षासाठी प्रामाणिक काम करण्यासाठी आणी पक्ष वाढीसाठी त्यांनी मोठ्या मोलाचे मार्गदर्शन केले.
या प्रसंगी ज्येष्ठ लोकनेते माजी आमदार भानुदास मुरकुटे,श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर भैया बेग, माजी नगरसेवक संतोष कांबळे, जिल्हाध्यक्ष नितीन औताडे, संजय निराधार चे शासकीय सदस्य उपजिल्हाप्रमुख संजय बाहुले, माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे, युवा नेते नीरज मुरकुटे, तालुका प्रमुख संतोष डहाळे, सागर कुदळे, संभाजी देवकर, विशाल दुर्गे, शुभम ताके, राजेश वाव्हळ,संजय फरगडे, शिवनाथ फोपसे, बाबासाहेब राऊत, बाबासाहेब कांबळे, प्रशांत कांबळे, शिवाजी सिनारे, सागर भांड ,भाऊसाहेब जाधव, बाबासाहेब शेंडे , आप्पासाहेब माकोणे , संस्कार जाधव, वसंत कदम, प्रज्वल पवार ,किशोर फाजगे आदीनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर 9561174111

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा