शिक्षकांचा आदर सन्मान करावा - RTO संदिप निमसे

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
हिंद सेवा मंडळाच्या क.जे. सोमैया हायस्कूल मध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती, ५ सप्टेंबर शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सहायक प्रादेशिक (आरटीओ) परिवहन अधिकारी संदिप निमसे, 
डॉ. सौ.ज्योत्सना तांबे, सौ. वैशाली जोशी, विद्यालयाचे चेअरमन रणजित श्रीगोड, कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन जितेंद्र अग्रवाल, शालेय समिती सदस्य प्रकाश कुलथे, किशोर फुणगे, सुर्यकांत कर्नावट, कारभारी कान्हे,अरुण धर्माधिकारी, शाळा व्यवस्थापन सदस्या दिप्ती आमले, किशोर कुलकर्णी, प्रशासनाधिकारी बी.एस. कांबळे, मुख्याध्यापक भूषण गोपाळे, हिंद सेवा मंडळ पतपेढी संचालक महेश डावरे, स्मिता पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.

इ.१० वी च्या विद्यार्थ्यांनी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची भुमिका केली, या विद्यार्थ्यांनी इ. ५ वी ते इ.९ वी च्या विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम केले . मुख्याध्यापक भुमिका चि. गणराज म्हसे, पर्यवेक्षक चि. आयुष शिंपी, उदय त्रिभुवन, मिथिलेश आहिरे, यांना उत्कृष्ठ विद्यार्थी शिक्षकाची भूमिका म्हणून घोषीत केले.

सर्व विद्यार्थी शिक्षक यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य भेट देऊन गौरव करण्यात आला.
शालेय समिती यांच्या वतीने विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा भेट वस्तु देऊन सत्कार करण्यात आला.

 विद्यालयाचे चेअरमन यांनी आपल्या मनोगतात शिक्षक दिनाचे महत्व सांगीतले. वैशाला जोशी, प्रकाश कुलथे, डॉ. ज्योत्स्ना तांबे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तथा शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 
आपल्या अध्यक्षीय भाषणात आरटीओ अधिकारी संदिप निमसे यांनी शिक्षकांचा आदर सन्मान करावा, तसेच शिक्षणाचे महत्व विशद केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल चोभे, सुत्रसंचालन रमेश धोंडलकर, आभार उर्मिला कसार यांनी मानले.

*वृत्त विशेष सहयोग*
अशोकराव खैरे (सर) श्रीरामपूर 

*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 
 श्रीरामपूर - 9561174111

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा