आदिल सद्दाम सय्यद याचा पहिला रोजा पूर्ण

माळीचिंचोरा, ता. नेवासा येथील अवघ्या ५ वर्षांच्या आदिल सद्दाम सय्यद या चिमुकल्याने आपला पहिला रोजा (उपवास) यशस्वीरित्या पूर्ण करून कुटुंबाचा आणि गावाचा मान वाढविला आहे.
आदिल हा सद्दाम युनूस सय्यद आणि अमरीन सद्दाम सय्यद यांचा सुपुत्र आहे. त्याच्या या पहिल्या रोज्याच्या निमित्ताने कुटुंबात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आदिलचे दादा युनूस सय्यद (मुख्याध्यापक, जिल्हा परिषद मराठी शाळा) यांनी नातवाच्या या धार्मिक जिद्दीचे कौतुक केले. तसेच नाना रफीक सत्तार शेख व नानी माहेमुबीन रफीक शेख यांनीही आदिलवर शुभेच्छांचा वर्षाव केला.
इतक्या लहान वयात रोजा पूर्ण केल्यामुळे आदिलचे सर्वत्र अभिनंदन होत असून त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा