कु. अझीन फातिमा फहीम खान याने पुर्ण केला रमजान चा पहिला रोजा

कु. अझीन फातिमा फहीम खान या ५ वर्षाच्या लहानगीने रमज़ान चा पवित्र रोज़ा पुर्ण केला. अझीन फातिमा ही सेक्रेड हार्ड कॉन्व्हेंट या शाळेत यु केजी मध्ये शिकत असून, आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने रमज़ानचा पवित्र उपवास धरण्याचा हट्ट केला. तिचे आई व वडील यांनी तिचा हट्ट पुर्ण करण्यासाठी तिला प्रोत्साहन दिले. अतिशय अवघड असणारा रमज़ानचा रोज़ा इतक्या कमी वयात पुर्ण केल्यामुळे परिसरातून आणि तिच्या कुटूंबातून तिचे कौतुक होत असल्याचे तिचे आजोबा माजी शिक्षण विस्तार अधिकारी अलीम शेख यांनी सांगितले. लहान वयातच मुलांवर सुसंस्कार झाल्यास भविष्यात त्यांना आदर्श जिवन शैली जगण्याची एक सुंदर सुरुवात मिळते असे देखील त्यांनी नमूद केले.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा