महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री,ज्यांनी आपल्या अल्पावधीच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीमध्ये अनेक झटपट निर्णय घेऊन प्रशासनामध्ये कशा पद्धतीने काम केलं जातं याचे उदाहरण घालून दिले, असे बॅरिस्टर अब्दुलरहमान अंतुले यांचा आज स्मृतिदिन. यानिमित्ताने त्यांच्या श्रीरामपूर भेटीचा आढावा घेणारा हा लेख.

बॅ. अंतुले साहेब आणि श्रीरामपूर

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री,ज्यांनी आपल्या अल्पावधीच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीमध्ये अनेक झटपट निर्णय घेऊन प्रशासनामध्ये कशा पद्धतीने काम केलं जातं याचे उदाहरण घालून दिले, असे बॅरिस्टर अब्दुलरहमान अंतुले यांचा आज स्मृतिदिन. यानिमित्ताने त्यांच्या श्रीरामपूर भेटीचा आढावा घेणारा हा लेख.

महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आपल्या झंझावाती कारकीर्दीने जनमाणसांच्या मनामध्ये एक वेगळं स्थान निर्माण केले असं राजकारणातील एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे बॅरिस्टर अब्दुलरहमान अंतुले साहेब.
काँग्रेस पक्षाचे निष्ठावान नेते, इंदिरा गांधींचे कट्टर समर्थक आणि समस्त कोकणवासीयांच्या गळ्यातील ताईत असलेले अंतुले साहेब 1969 साली राज्याच्या मंत्रिमंडळात बांधकाम खात्याचे राज्यमंत्री असताना श्रीरामपूरच्या कोर्टाची इमारत त्यांनी मंजूर केली. त्यासाठी ते श्रीरामपूरला देखील आले.त्यानंतर त्यांचं आणि श्रीरामपूरचं एक अतूट असं नातं निर्माण झालं
 मला आठवतंय 1980 साली पद्मभूषण खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या खासदारकीच्या प्रचारासाठी अंतुले साहेब श्रीरामपूरला आले होते. मेन मेनरोडवर अशोक कारखान्याच्या ऑफिस समोर त्यांची अतिशय मोठी जाहीर सभा झाली. त्यावेळी ते अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस होते.सभेची गर्दी पाहून त्यांनी जाहीर केलं कि बाळासाहेब विखे आजच निवडून आलेले आहेत आणि त्याप्रमाणेच घडले.
 लोकसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार इंदिरा गांधींनी बरखास्त केलं. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या.  अंतुले साहेब श्रीवर्धन मतदारसंघातून निवडून आले आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. बाळासाहेब विखे आणि अंतुले साहेब यांची मैत्री सर्वश्रुत होती. इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान काढण्याची खरी योजना खासदार बाळासाहेब विखे पाटील यांची होती. त्यांनी ती अंतुले साहेब यांना करायला लावली. पुढे प्रतिभा प्रतिष्ठानच्या देणग्या वरून अंतुले साहेबांचे मुख्यमंत्रिपद गेलं. तत्पूर्वी 1982 साली नगरच्या फिरोदिया हायस्कूल च्या मैदानात ते मुख्यमंत्री असताना झालेली सभा सुद्धा मला आठवते. खासदार विखे साहेबांनी त्यासाठी श्रीरामपूरातून लोकांना नेण्यासाठी गाड्यांची व्यवस्था केली होती. एका ट्रकमध्ये मी देखील त्या सभेला गेलो होतो. रात्री दहा वाजता ती सभा संपली. त्या सभेत काहींनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून अंतुले साहेबांनी उपस्थित पोलिसांना दिलेला सज्जड दम आज ही स्मरणात आहे.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि श्रीरामपूर तालुक्याचे सुपुत्र बॅ .रामरावजी आदिक यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नेते गोविंदराव आदिक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे, बॅरिस्टर अंतुले साहेब, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मिर्झा इर्शाद बेग व राज्य मंत्रिमंडळातील डझनभर मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रामराव आदिक यांच्या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम मेनरोड वर आयोजित केला होता. आमदार जयंत ससाणे साहेब यांच्याकडे त्या कार्यक्रमाचे नियोजन होतं. अतिशय उत्कृष्टपणे तो कार्यक्रम संपन्न झाला. त्या दिवशी अंतुले साहेब व रामरावजी आदिक साहेब यांचा मुक्काम अर्चना हॉटेलमध्ये होता. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही काही पत्रकार मित्र अंतुले साहेबांना भेटण्यासाठी तेथे गेलो होतो. ज्येष्ठ पत्रकार रमेशभाऊ कोठारी, अशोक तुपे, सुनील नवले, बाळासाहेब आगे व मी आदींनी अंतुले साहेबांची भेट घेतली. त्या वेळी श्रीरामपूरातील अंतुले साहेबांचे निस्सीम चाहते नजीरभाई शेख टेम्पोवाले तसेच बशीरभाई बागवान, हमीद चौधरी, एस के खान आदी मित्र सुद्धा त्या ठिकाणी होते. मी अंतुले साहेबांचा शाल देऊन श्रीरामपूरकरांच्या वतीने सत्कार केला आणि  त्यांचा हात हातात घेऊन एक शेर त्यांना ऐकविला.तो असा -
*कदम कदम पे सितारे उतर के आयेंगे*
*तेरे नसीब मे तारे उतरके आयेंगे* 
*तू सहारा बन के निकल बे सहारो का*
*तेरी मदद को फरिश्ते उतर के आयेंगे*
हा शेर ऐकल्यानंतर अंतुले साहेब अतिशय खूष झाले. त्यांनी तो माझ्याकडून लिहून घेतला आणि माझ्या पाठीवर हात ठेवून शाबासकी देखील दिली.
 प्रतिभा प्रतिष्ठानच्या विरोधात रामदास नायक यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या केसेसमुळे अंतुले साहेब बराच काळ राजकारणापासून अलिप्त झाले. त्या प्रकरणातून निर्दोष सुटल्यानंतर ते पुन्हा एकदा खासदार झाले. केंद्रामध्ये आरोग्य मंत्री झाले. मुंबईमध्ये गोरगरिबांसाठी एक सुपर मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल असावे यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. त्यांचे ते स्वप्न अपूर्ण आहे. मुख्यमंत्री म्हणून ते बेधडक अचानकपणे कार्यालयांना भेटी द्यायचे आणि तेथील कामकाजाची पाहणी करायचे. चिंचवड येथील आरटीओ ऑफिसला दिलेली भेट किंवा मुंबईच्या रेड लाईट एरिया मध्ये मध्यरात्री दिलेली भेट, दौऱ्यावर असताना कुठेतरी गावांमध्ये ग्रामपंचायत किंवा शाळा किंवा सरकारी दवाखाने यांना दिलेल्या भेटी हे त्या काळामध्ये खूप चर्चेचा विषय असायच्या.त्यांचा जनता दरबार म्हणजे सरकारी न्यायालय असायचे राज्यभरातून लोक या ठिकाणी येऊन आपली गाराने मांडायचे आणि त्वरित तेथेच आदेश देऊन संबंधित व्यक्तीचा प्रश्न ते मार्गी लावायचे . गरिबांबद्दल अतिशय कनवाळू असलेल्या अंतुले साहेबांची कारकीर्द ही संस्मरणीय अशी आहे. आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. 
*सलीमखान पठाण* श्रीरामपूर.
9226408082.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा