मख़दूम समाचार
पंढरपुर (प्रतिनिधी) २९.६.२०२३
दरवर्षी येथील विठ्ठल मंदिरात होणाऱ्या शासकीय पुजेचा मान यंदा अहमदनगर जिल्ह्यातील तालुका नेवासा मधील वाकडी या गावातील काळे भाऊसाहेब मोहनीनाथ व त्यांच्या पत्नी मंगल यांना मिळालेला आहे. काळे पतीपत्नी हे गेल्या ३५ वर्षांपासून पंढरपुरला दिंडीमधे येत आहेत. ते देवगड येथील मुळ असलेल्या भिलबाबा उर्फ किसनगिरी महाराज यांच्या भास्करगिरी महाराज पायी दिंडीत सहभागी होत असतात. त्यांना यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी लता शिंदे दांपत्यासोबत महापुजेचा मान मिळालेला आहे. एसटी महामंडळाकडून त्यांना एक वर्षांचा मोफत पासही देण्यात येणार आहे.
आज दि. २९ रोजी पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामधे आषाढी एकादशीची शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी विठ्ठल मंदिर देवस्थान समितीचे अध्यक्ष महाराज गहिनीनाथ औसेकर, डॉ. श्रीकांत शिंदे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील, दादाजी भुसे, तानाजी सावंत, गिरीश महाजन, दीपक केसरकर उपस्थित होते.
Post a Comment