अहिल्यानगर (प्रतिनिधी ): *शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून लवकरच होणाऱ्या १७ व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या निमित्ताने नवोदित लेखक, कवींसाठी कथा लेखन व कविता लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून यामध्ये नवोदितांनी सहभागी व्हावे* असे आवाहन शब्दगंध चे संस्थापक सचिव सुनील गोसावी व अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी केले आहे.
कथा लेखन स्पर्धेसाठी एकल महिलांचे प्रश्न, विधवा प्रथा निर्मूलन अथवा विधवा प्रथा विरोधात प्रकाश टाकणाऱ्या कथा असा विषय स्पर्धेसाठी ठेवण्यात आला आहे, कथा शब्द मर्यादा 3000 शब्द,असे स्पर्धा प्रमुख प्रा.डॉ.तुकाराम गोंदकर यांनी कळवले.
खुल्या कविता लेखन स्पर्धा होत असुन विषयाचे कोणतेही बंधन नसल्याचे स्पर्धा प्रमुख स्वाती ठुबे यांनी कळवले आहे. स्पर्धकांनी आपल्या कथा, कविता कागदाच्या एका बाजूस लिहून अथवा टाईप करून शब्दगंध साहित्यिक परिषद, फुलोरा,लक्ष्मी कॉलनी, भिस्तबाग महालाजवळ, तपोवन रोड, सावेडी, अहिल्यानगर ४१४००३ येथे दि.५ मार्च २०२६ पर्यंत कथा, कविता स्वतःच्या असल्याचे प्रतिज्ञापत्र, परिचय,पासपोर्ट फोटो सह पाठवाव्यात, असे आवाहन प्रा.डॉ. तुकाराम गोंदकर,स्वाती ठुबे व शर्मिला गोसावी यांनी केले आहे.
कथा स्पर्धेसाठी विधवा महिला लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम चे प्रणेते प्रमोद झिजार्डे, करमाळा यांच्या वतीने रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.
Post a Comment